पेडणे (प्रतिनिधी) दोन दिवसापूर्वी पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे कोकण रेल्वे मार्गावर मालपे रेल्वे स्थानकापासून सातशे मीटरच्या अंतरावर असलेल्या मालपे – खाजने पेडणे या बोगद्याचा भाग मध्यरात्री 3.30 च्या दरम्यान कोसळला. त्यामुळे रेल्वे वाहतुक ठप्प झाली आहे. सुदैवाने या दराम्यान रेल्वे वाहतूक झाली नसल्याने मोठी दुर्घटना टळली.
रेल्वे मिरजमार्गे वळविल्या
या मार्गावरील मुंबईकडून येणाऱया तसेच मंडगाव येथून जाणाऱया सर्व रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आल्या . एर्नाकुलम निजामुद्दीम सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेस, थिरुवंतनपुरम सेंट्रल लोकमान्य टिळक स्पेशल एक्सप्रेस, राजधानी स्पेशल एक्सप्रेस, निजामुद्दीम एर्नाकुलम एक्सप्रेस व लोकमान्य टिळक थिरुवंतनपुरम सेंट्रल एक्सप्रेस या गाडय़ा पनवेल- पुणे- मिरज- लोंडा मार्गे मडगाव अशा वळविण्यात आल्या .
मालपे – खाजने हा बोगदा दिड किलोमिटर लांब
मालपे रेल्वे स्थानकापासून सातशे मीटरच्या अंतरावर असलेला बोगदा हा खाजने गावात बाहेर पडते. हा बोगदा दिड किलोमीटर आहे. पावसाळय़ात मोठय़ा प्रमाणात या ’ च्या बाजूने बांधलेल्या निचारा गटारातून पाणी सतत वाहत असते. या बोगद्याची माती ही शेड असल्याने ती लवकर कोसळते. बोगद्याचे काम ज्या वेळी बांधण्यासाठी हाती घेतले त्यावेळी कंपनीची बरीच हे काम करताना दमछाक झाली होती.
ड़ बोगदा सुरु होतो तेथून तीनशे मीटरच्या अंतरावर मुंबईकडे जाणाऱया रेल्वे मार्गाचा उजवीकडील भाग सुमारे चार मीटर बोगद्याच्या भिंतीचा भाग कोसळून रेल्वे मार्गावर माती दगड पडले. तर काही भाग हा कोसळण्याच्या स्थितीत होता.
पावसाच्या पाण्यामुळे बोगद्याचा भाग कोसळल्याची शक्मयता
गेले तीन चार दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बोगद्याच्या बाजूच्या भागाला पाणी ओढल्याने ते पाणी बोगद्याला लागल्याने तसेच डोंगराळ भागातील पाणी शिरल्याने बोगद्याचा कोसळला .
राञी 3.30 च्या सुमारस बोगद्याचा भाग कोसळला , किमान तीन दिवस री हा मार्ग बंद राहणारः कोकण रेल्वेचे उपमहाप्रबंधक बबन गाडगीळ
मालपे येथील बोगद्याचा भाग राञी 3.30 च्या सुमारास कोसळय़ाची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर या मार्गावरील रेल्वे सेवा बंद करुन ती पनवेल , पुणे , मिरज , मडगाव अशा वळविण्यात आल्याची माहिती रेल्वेचे उपमहाप्रबंधक बबन गाडगीळ यांनी मालपे येथे कोससलेल्या बोगद्याची पाहणी केल्यानंतर दैनिक तरुण भारतला दिली.
सध्या माती काढण्यासाठी रेल्वे कडून जेसीबी यंञ दुपारी खास रेल्वेच्या कामासाठी असलेल्या रेल्वे ट्रालीवरुन आणण्यात आले. त्यापूर्वी सुमारे तीस मजूर कामगार यांच्या मदतीने काही प्रमाणात माती बाजूला काढण्यात आली. बोगद्यात काळोख असल्याने तसेच बोगद्याचा भाग हा कोसळण्याच्या स्थितीत असल्याची पहाणी करत या ठिकाणी मजूर न घालता ते काम जेसीबीच्या सहाय्याने हाती घेण्यात आले. माती काढण्याची काम राञी उशीरापर्यंत सुरू होते.
बोगद्याचे काम हे युद्ध पातळीवर सुरू असून किमान तीन दिवसतरी हे काम पूर्ण करण्यासाठी लागणार असल्याची माहिती रेल्वे अधिकारी बबन गाडगीळ यांनी दिली. जर कोसलेल्या बागातून माती पडत राहिल्यास जादा वेळ लागणार असल्याचे त्यांनी सांगितले . बोगद्यावरुन पाण्याचा पावसाचा प्रवाह तसेच बोगद्यातून पाणी निचारा होऊन जात असल्याने या ठिकाणी लक्षपूर्वक काम करावे लागणार तसेच का?क्रिट घालून हे पूर्ण करण्यासाठी वेळ लागणार असल्याची माहिती गाडगीळ यांनी दिली.