-सभासदांना 24 टक्के लाभांश -उद्या ऑनलाईन सभा
प्रतिनिधी/कोल्हापूर
माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेने (कोजिमाशि) यंदा लाभांशचा उच्चांक गाठला आहे. 24 टक्के प्रमाणे 4 कोटी 28 लाख रुपये अदा करण्यात येणार आाहेत. यासह सभासदांना ए.टी.एम. कार्डचे सुविधा दिली जाणार आहे. अशी माहिती चेअरमन बाळ डेळेकर यांनी दिली. संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार 26 रोजी संस्थेच्या प्रधान कार्यालयातून ऑनलाईन होणार आहे. सभासदांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली जातील. जास्तीत जास्त सभासदांनी या सभेत सहभागी व्हावे, असे आवाहनही चेअरमन डेळेकर, व्हाचेअरमन सुभाष पाटील, तज्ञ संचालक दादासाहेब लाड यांनी केले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, सभासद हिताचा कारभार करण्याचा मानस आणि सभासदांची मागणी लक्षात घेवून भाग भांडवल मर्यादा वाढ करणे, नविन सभासद वाढीसाठी सभासद होणेसाठीची पात्रता आदी उपविधी दुरुस्तीसाठी ठेवले असल्याचे चेअरमन बाळ डेळेकर यांनी सांगितले.
कोविड महामारीच्या काळात 285 सभासदांना रुपये 14 लाख 25 हजारची रक्कम चेकने मदत म्हणून वाटप केली असून पूरग्रस्त शाळा व सभासदांना रुपये 13 लाख 2 हजार इतकी अदा केली आहे. त्याचबरोबर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीकडे 2 लाख 50 हजार इतकी रक्कम प्रदान केली आहे. महापूर व कोविड महामारी काळात सभासदांना आर्थिक मदत करणारी कोजिमाशि ही महाराष्ट्रातील एकमेव वित्तीय संस्था आहे. विमानवारी योजनेअंतर्गत सभासदाला देशांतर्गत विमान प्रवासासाठी रुपये 10 हजार व देशाबाहेर विमान प्रवासाठी रुपये 20 हजार बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन देणारी ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचे चेअरमन बाळ डेळेकर यांनी सांगितले. यापुढेही संस्थेचा पारदर्शी कारभार करुन लैकिक कायम ठेवण्यासाठी सभासदांनी सहकार्य करुन विषय पत्रिकेवरील विषयांना मंजुरी द्यावी असे आवाहन केले आहे
भागभांडवल 19 कोटी 40 लाख
ठेवी 466 कोटी 39 लाख
कर्ज 390 कोटी 41 लाख
गुंतवणूक 162 कोटी69 लाख
निधी 32 कोटी 15 लाख
नफा 4 कोटी 22 लाख
लभांश 24 टक्के
ऑडीत वर्ग `अ’