ता. पं. सदस्य सदाशिव बुदिहाळे यांचे प्रतिपादन- कोडणी येथे विकासकामांचा शुभारंभ
वार्ताहर/ निपाणी
ज्या विश्वासाने कोडणी ग्रामपंचायतीची सूत्रे जनतेने भाजपच्या हाती सोपविली आहेत. त्या विश्वासाला पात्र राहून मंत्री शशिकला जोल्ले, खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कोडणी, गायकवाडीचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन ता. पं. सदस्य सदाशिव बुदिहाळे यांनी केले. येथील माळभागात रेणुका मंदिर गल्लीत ता. पं. फंडातून रस्ताकामाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते.
बुदिहाळे पुढे म्हणाले, कोडणी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात रेणुका मंदिर गल्ली 2.70 लाख, गुडाळे गल्ली 2 लाख, खवरे माळ 2.50 लाख याप्रमाणे निधी मंजूर झाला आहे. टप्प्याटप्प्याने दर्जेदार पद्धतीने ही कामे पूर्ण केली जाणार आहेत. यापुढील काळात तालुका पंचायतीसह ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध विकासकामे करण्यात येतील, असे सांगितले.
यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्ष राजू खवरे, ज्ञानदेव खवरे, राजू कानडे, दत्ता पठाडे, ग्रा. पं. सदस्य अशोक महाजन, गणपती खोत, सुनील खवरे, राजू शिंदे, सतीश माने, नवनाथ खवरे, वसंत तांबेकर, तानाजी खवरे, सुरेश पाटील, सचिन पाटील, अल्लाउद्दीन मुल्ला, आप्पा पाटील, मधुकर कुटाळे, विक्रम खोत, रफिक मुल्ला आदी उपस्थित होते.