एका महिन्यात १५० रूग्ण कोरोनामुक्त : डॉ. जयंत पाटील
प्रतिनिधी / वारणानगर
पन्हाळा – शाहूवाडी तालुक्यातील डोंगराळ दुर्गम भागातील कोरोना रुग्णांना ताबडतोब सेवा मिळावी या हेतूने पन्हाळा तालुक्यातील कोडोली सारख्या ग्रामीण भागात पहिले यशवंत धर्मार्थ रुग्णालयामार्फत दि. १३ ऑगस्ट रोजी अद्यावत असे शंभर बेडचे समर्पित कोविड रुग्णालय सुरू झाले आहे.
कोविड रुग्णालयाचा शुभारंभ राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील, यड्रावकर यांच्या हस्ते झाला. पालकमंत्री ना. सतेज पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारा उपस्थिती दाखवत मार्गदर्शन केले होते. आरोग्यमंत्री यड्रावकर व पालकमंत्री ना. पाटील यांनी ग्रामीण भागातील कोरोना रूग्णांना वरदान ठरावे असा आदर्श निर्माण करण्याची व्यक्त केलेली अपेक्षा आपल्या सेवेने कोविड रुग्णालयाने सार्थ ठरवली आहे.
कोविड रूग्णालयाच्या माध्यमातून समर्पित सेवा देणाऱ्या देशाच्या शहरातील खाजगी रुग्णालयाच्या बरोबरीने सर्व सोयीनीयुक्त उपचार ग्रामीण भागातील या कोविड रुग्णालयात मिळतात शिवाय शासनाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे उपचार घेतलेल्या रुग्णांना बील आकारले जात असल्याने रूग्णासह नातेवाईकात देखील समाधान आहे.
माजी आमदार स्व.यशवंत ए. पाटील यांचा वारसा दोन डॉक्टर नातू चालवतायेत……
पन्हाळा – बावड्याचे माजी आ.स्व. यशवंत ए. पाटील दादा यांनी कोडोली सारख्या ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू केले याच ठिकाणी आयुर्वेदातील पदवीत्तर शिक्षण, नर्सिग कॉलेज अशा वैद्यकीय शिक्षणाच्या अनेक सुविधा सुरु करीत गोर गरिबाला चांगले वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी धर्मार्थ रूग्णालय, हॉस्पीटल सुरू केले. याच रूग्णालयात मोफत उपचार व्हावेत यासाठी शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू केली. याचा लाभ आजवर जनतेला होत आला आहे. यशवंत वैद्यकीय सेवेचा वटवृक्ष करण्यात संस्थेचे व्यवस्थापक स्व. प्रदीप पाटील बाबा यांचा मोलाचा वाटा आहे आज कोरोना महामारी सुरू झालेवर येथील जनतेला उपचार मिळण्यासाठी माजी आ. यशवंत ए. पाटील यांचे नातू डॉ. जयंत पाटील, डॉ. अभिजीत इंगवले यांनी समर्पित कोव्हिड रूग्णालय सुरू केले समाजसेवेप्रति आजोबांचा वारसा या दोन नातवांनी चालवला आहे.
यशवंत कोविड हॉस्पीटलला महात्मा फुले जनआरोग्य सेवा शासनाने सुरू करावी ….
यशवंत धर्मार्थ रुग्णालयास शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक आजारांवर मोफत उपचार केले जातात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने धर्मार्थ रूग्णालयात कोरोना रुग्णावर उपचार केले जात नाहीत त्याऐवजी माले फाट्यावर स्वतंत्र भव्य इमारतीत यशवंत समर्पित कोविड रूग्णालय सर्व सोयीनी सुरू आहे. ते धर्मार्थ रुग्णालयाच्या आवारात नसल्याने कोरोना रूग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील आर्थिक परस्थिती नसलेल्या रुग्णांना कोरोनावर उपचार घेणे अवघड झाले आसून शासनाने यशवंत कोव्हिड रुग्णालयाचा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्याची मागणी होऊ लागली आहे.
यशवंत कोविडचे सेवेतील योध्दे, एका महिण्यात १५० कोरोना मुक्त
यशवंत आयुर्वेदिक महाविद्यलयाचे प्राचार्य डॉ मिलिंद गोडबोले, कोव्हिड हॉस्पीटलचे प्रमुख डॉ सूर्यकिरण वाघ, नियत्रंक डॉ. अभिजित इंगवले तसेच डॉ हर्षल साबळे, डॉ अभिजित शिराळकर, डॉ नरेंद्र पाटील, यशवंत नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ग्रेस गायकवाड, अधिक्षक रवींद्र पोवार, यांच्या सह नर्सिंग कर्मचारी व प्यारामेडीकल कर्मचारी यांनी अविरत काम केले असल्याचे डॉ./ जयंत प्रदिप पाटील यांनी सांगून एका महिन्यात दीडशेहून अधिक रुग्ण कोरोना मुक्त झाल्याची माहिती संस्थेचे सचिव डॉ. जयंत प्रदिप पाटील यांनी दिली.