प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात कोरोनाच्या दुसऱया लाटेत सोमवारी 11 जणांचा बळी गेला. यामध्ये जिल्हय़ातील 10 जण असून त्यात 8 महिलांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 308 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये शहरातील 161 रूग्ण आहेत. रूग्णसंख्या वाढल्याने सक्रीय रूग्णसंख्या 2 हजार 408 झाली आहे. कोरोना रूग्ण, बळींची संख्या वाढल्याने कोरोनाचा उद्रेक झाल्याने धास्ती वाढली आहे.
जिल्हय़ात सोमवारी कोरोनाने 11 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहरातील 4 तर जिल्हय़ातील 6 जण आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये पन्हाळा तालुक्यातील नावली येथील 65 वर्षीय पुरूष, सांगली जिल्हय़ातील शिगाव (ता. वाळवा) येथील 75 वर्षीय महिला, नाना पाटीलनगर येथील 40 वर्षीय महिला, रंकाळा येथील 56 वर्षीय महिला, साने गुरूजी वसाहतीतील 67 वर्षीय महिला, तपोवन कळंबा येथील 70 वर्षीय महिला, शाहूवाडी तालुक्यातील आवतूर येथील 80 वर्षीय महिला, येळाणे येथील 66 वर्षीय पुरूष, पन्हाळा तालुक्यातील जाखले येथील 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चंदगड येथील 40 वर्षीय महिला आणि करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील 69 वर्षीय पुरूषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
जिल्हय़ात नववर्षात कोरोनाच्या दुसऱया लाटेत सोमवारी 11 जणांचा मृत्यू झाला. यातील अधिकतर मृत्यू 60 वर्षांवरील आहेत. आजपर्यत कोरोनाने 1 हजार 823 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागातील 881, नगरपालिका क्षेत्रात 355, कोल्हापूर शहरात 413 तर अन्य 174 जण आहेत. जिल्ह्य़ातील कोरोना मृत्यू नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेने चांगले प्रयत्न केले होते. तरीही कोरोना मृत्य़ूची संख्या वाढत असल्याने कम्युनिटी स्प्रेडचा धोका वाढला आहे.
जिल्हय़ात सोमवारी 99 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 50 हजार 472 झाली आहे. गेल्या 24 तासांत 308 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 6, भुदरगड 7, चंदगड 1, गडहिंग्लज 12, गगनबावडा 1, हातकणंगले 19, कागल 3, करवीर 29, पन्हाळा 10, राधानगरी 7, शाहूवाडी 3, शिरोळ 15, नगरपालिका क्षेत्रात 26 कोल्हापुरात 161 तर अन्य 8 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 54 हजार 703 झाली आहे. दिवसभरात 2 हजार 110 जणांची तपासणी केली. त्यातील 440 जणांची अँटीजेन टेस्ट केली. शहरात 474 तर ग्रामीण भागात 925 जणांना होम कोरोंटाईन केले आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून सोमवारी आलेल्या 1 हजार 680 अहवालापैकी 1 हजार 451 निगेटिव्ह आहेत. अँटिजेन टेस्टचे 90 अहवाल आले. त्यातील 71 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 385 रिपोर्ट आले. त्यातील 104 निगेटिव्ह आहेत. सध्या 2 हजार 408 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
Previous Articleलॉकडाऊनमध्ये नियम पाळत चित्रिकरणाला परवानगी द्या
Next Article सीपीआर’मधील नॉन कोरोना रूग्ण स्थलांतरीत
Abhijeet Khandekar
Meet Abhijeet Khandekar : a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. With a Master's degree in Journalism from Shivaji University, Abhijeet specializes in political news, entertainment, and local content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives. Connect with Abhijeet for collaborations and captivating content that informs and entertains.
Related Posts
Add A Comment