- शुक्रवारी 25,681 नवे रुग्ण; 70 मृत्यू
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. रुग्ण संख्या रोखण्यासाठी एकीकडे सरकारने लसीकरणाचा वेग आणखी वाढवला आहे. मात्र, दररोज रुग्ण संख्येत आणि मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत आहे. अनेक शहारांमध्ये तर लॉकडाऊन देखील घोषित करण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवारी तब्बल 25,681 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. तर 70 जणांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 24 लाख 22 हजार 021 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 53 हजार 208 एवढा आहे.
कालच्या एका दिवसात 14,400 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 21 लाख 89 हजार 965 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.42 % आहे. सद्य स्थितीत राज्यात 1 लाख 77 हजार 560 रुग्ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 1 कोटी 80 लाख 83 हजार 977 नमुन्यांपैकी 13.39 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 8 लाख 67 हजार 333 क्वारंटाईनमध्ये असून, 7 हजार 848 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.