ऑनलाईन टीम/मुंबई
कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. भारतात देखील या संसर्गजन्य रोगाने शिरकाव केला आहे. भारतात आतापर्यंत कोरोना संशयिताची संख्या 73 झाली आहे. तर महाराष्ट्रात 12 संशयित रुग्ण आढल्याने सरकारकडून योग्यती खबरदारी घेतली जात आहे. जिल्हापातळीवर तर योग्य खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनेक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
याचीच खबरदारी घेत यंदाचे शंभरावे नाट्य संमेलनही पुढे ढकलण्यात आले आहे. यासंबंधीची माहिती नाट्य परिषदेच्यावतीने देण्यात आली आहे. 25 मार्च रोजी होणारे नाट्य संमेलन आता 14 जून 2020 या कालावधीत होणार आहे.