ऑनलाईन टीम / हैदराबाद :
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. त्यातच शनिवारी तेलंगणातील के चंद्रशेखर राव सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

- लॉकडाऊन हटवणारे देशातील पहिले राज्य
आज झालेल्या कॅबिनेट बैठकीत तेलंगणातील लॉकडाऊन 20 जून म्हणजेच उद्यापासून पूर्णपणे उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार तेलंगणामध्ये आता उद्यापासून सर्वकाही सुरु होणार आहे. इतकेच नाही तर तेलंगणामध्ये आता नाईट कर्फ्यू , वीकेंड लॉकडाऊनचे नियम देखील हटविण्यात आले आहेत. त्यामुळे पूर्णपणे लॉकडाऊन हटवणारे तेलंगणा हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
- तेलंगणातील कोरोनाची सद्यस्थिती
तेलंगणामध्ये शुक्रवारी आलेल्या आकडेवारीनुसार, 1417 नवे कोरोना रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्यचे आकडा 6,10,834 इतका पोहोचला. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या काही हजारांच्या घरात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे पाहून, तेलंगणा सरकारने लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतला आहे