3 मृत्यू, 114 नवे रूग्ण,140 कोरोनामुक्त, आजरा, भुदरगड, चंदगड, गगनबावडा, राधानगरीत नवी रूग्ण नोंद शुन्य
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने सात जणांचा मृत्य़ू झाला. यामध्ये शहरातील 1 व परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. दिवसभरात 114 नवे रूग्ण आढळले तर 140 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 1 हजार 504 झाली आहे. नव्या रूग्णांसह, सक्रीय रूग्णांत घट झाली आहे. गगनबावडा, चंदगड, भुदरगड, आजरा, चंदगड तालुक्यात नव्या रूग्णांची नोंद शुन्य आहे.
जिल्हय़ात सोमवारी कोरोनाने 7 जणांचा मृत्य़ू झाला. यामध्ये शहरातील महालक्ष्मी काŸलनी येथील एक, परजिल्हय़ातील सोलापूर, बेळगाव येथील प्रत्येकी एक आणि कागल, शिरोळ तालुक्यातील 1 तर हातकणंगले तालुक्यातील दोघांचा समावेश आहे. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 698 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 3 हजार 47, नगरपालिका क्षेत्रात 819, शहरात 1 हजार 239 तर अन्य 593 आहेत. दिवसभरात 140 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 96 हजार 683 झाली आहे. गेल्या 24 तासांत 140 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 4, गगनबावडा 0, हातकणंगले 20, कागल 4, करवीर 20, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 4, शिरोळ 18, नगरपालिका क्षेत्रात 17, कोल्हापुरात 23 तर परजिल्ह्य़ातील तिघा जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 2 लाख 3 हजार 885 झाली आहे. सद्यस्थितीत शहरात 14 आणि ग्रामीण भागात 371 जण होम कोरोंटाईन असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.