खेड / प्रतिनिधी
खेड तालुक्यातील दस्तूरी केंद्र शाळेतील शिक्षिकेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शाळा बंद ठेवण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली आहे. पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहणार असल्याचे तालुका शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
केंद्र शाळेत इयत्ता 1 ते 7 वी चे वर्ग भरतात. चार दिवसांपासूनच प्राथमिक शाळा गजबजू लागल्या आहेत. त्यानुसार ही केंद्र शाळाही सुरू झाली होती. शाळेत 50 हून अधिक विधार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षिकाच कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनाने तातडीने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. आणखी काही दिवस शाळा बंद राहणार असल्याचे समजते. या शिक्षिकेच्या पतीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहितीही पुढे आली आहे.