प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हय़ात कोरोना विरूद्धच्या लढय़ात दिलासादायक आकडे येऊ लागले आहेत. कोरोनामुक्त होणाऱया रूग्णांनी गुरूवारी 49 हजारांचा आकडा ओलांडत 50 हजारांकडे वाटचाल सुरू केली आहे. गुरूवारच्या अहवालात केवळ एका बाधिताचा मृत्यू झाला असून दहा तालुक्यांत मृत्यूची नोंद झाली नाही. कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना जिल्हावासियांनी संसर्ग पुन्हा वाढू नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. गुरूवारी रात्रीच्या अहवालात …. रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
संसर्ग वाढू न देण्याची खबरदारी आवश्यक
बुधवारच्या अहवालात 153 बाधित आढळले होते. यात सातारा तालुक्यात 43 रूग्ण वाढले आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये रूग्णांचा आकडा कमी आहे. तर सहा तालुक्यात एकेरी रूग्णसंख्या आहे. कोरोनाचे आकडे कमी होत असताना संसर्ग वाढू न देण्याची खबरदारी सर्वांनी घेणे आवश्यक आहे. यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळणे गरजेचे आहे. लस नवीन वर्षात येणार असल्याच्या बातम्यांनी कोरोनाची धास्ती कमी होत असली तरी डिसेंबर, जानेवारी हे महिने अधिक महत्वाचे आहेत.
285 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज
जिह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 285 नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे कोरोनामुक्ती 49 हजार 155 इतकी झाली असून 50 हजारांच्या टप्प्याकडे कोरोनामुक्तीची वाटचाल सुरू झाली आहे. रूग्णसंख्या घटली असल्याने जिल्हय़ात कोरोना रूग्णांसाठी उभारलेल्या यंत्रणेवरील ताण संपुष्टात आला आहे.
केवळ एका रूग्णाचा मृत्यू
जिल्हय़ाच्या मृत्यूदराबाबत चिंतेचे वातावरण आहे. राज्याच्या मृत्यूदरापेक्षा जिल्हय़ाचा मृत्यूदर जास्त आहे. ज्येष्ठ नागरिक, व्याधीग्रस्त नागरिकांच्या मृत्यूचा आकडा सतत वरखाली होत आहे. गुरूवारच्या अहवालात कराड, सातारा, फलटणमध्ये मृत्यूची नोंद झाली नाही. खासगी हॉस्पीटलमध्ये निसरे (ता. पाटण) येथील 85 वर्षीय पुरुष कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
360 जणांचे नमुने तपासणीला जिल्हय़ातून गुरूवारी 360 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. स्व. क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथील 20, कराड येथील 21, फलटण येथील 6, कोरेगाव येथील 22, वाई येथील 24, खंडाळा येथील 13, रायगाव येथील 44, पानमळेवाडी येथील 65, महाबळेश्वर येथील 21, दहिवडी येथील 29, खावली येथील 20, मायणी येथील 8, म्हसवड येथील 4, पिंपोडा येथील 4 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 59 असे एकुण