मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताच आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात अनेक कठोर निर्बंध लादण्यात आले असून वीकेंड लॉकडाऊनही लागू करण्यात आला आहे. अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज, रविवारी यासंदर्भात टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यात येणार असून त्यानंतरच याबद्दलचा निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी लॉकडाऊन लागू केला जाण्याची शक्यता आहे. काल, शनिवारी राज्यातील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक पार पडली.
Previous Articleसांगली जिल्ह्यात कोरोनाचे ४११ नवे रुग्ण, चार बळी
Next Article अमेरिकन युद्धनौकेचा लक्षद्वीपजवळ सराव
Related Posts
Add A Comment