ऑनलाईन टीम / लिमा :
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी पेरू देशातही दिल्ली सरकारप्रमाणे ऑड-ईव्हन फॉर्म्युला लागू करण्यात आला आहे. पेरू देशाने हा फॉर्म्युला वाहनांसाठी नाही तर तेथील नागरिकांसाठी लागू केला आहे. पेरूचे राष्ट्रपती मार्टीन विजकारा यांनी या नियमाची घोषणा केली आहे.
कोरोना विषाणूने जगभरातील 195 हून अधिक देशांना विळखा घातला आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 1414 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. तर 55 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पेरूमध्ये लिंग आधारित क्वॉरन्टाईनची घोषणा करण्यात आली आहे.
पेरूमध्ये लागू करण्यात आलेल्या ऑड-ईव्हन फॉर्म्युल्यानुसार एका दिवशी महिला घराबाहेर पडू शकणार आहे. तर दुसऱ्या दिवशी पुरुषांना घराबाहेर पडता येणार आहे. सोमवार, बुधवार आणि शुक्रवारीकेवळ पुरुष घराबाहेर पडतील. तर मंगळवार, गुरुवारआणि शनिवारी महिलांना घराबाहेर पडता येईल. 12 एप्रिलपर्यंत हा नियम पेरूमध्ये लागू असणार आहे.