फोंडय़ात दुकान थाटून अल्प दरात फळांची विक्री
वार्ताहर /माशेल
कोरोना लॉकडाऊन काळात बागायत मालाची प्रत्यक्ष बाजारातील विक्री थंडावली. बागायतीचा माल डोळय़ादेखत घरात पडून सडताना बघून एका खांडेपार येथील प्रगतशील बागायतदार आशिष गोब्रे घरोघरी जाऊन विक्री करण्याचे धाडस केले. आज फोंडा येथे दुकानात बागायती मालाची अल्प दरात विक्री करीत जमही बसवला आहे.
आशिष गोबरे यानी कोरोना महामारीच्या काळात आपल्या बागायती कामाबरोबर बागायत उत्पादनातून विविध खाद्यपदार्थ बनविले. बागायतीतील उत्पन्न अननस, फणस, केळी, चिकू व अन्य फळे घरोघरी जाऊन विकण्यास प्रारंभ केला आहे तसेच याकामी त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
कोरोनामुळे फोंडा बाणस्तारी व इतर साप्ताहित बाजार बंद आहेत. तसेच राज्यस्तरिय कर्फ्य़ुमुळे माल विक्रीस घेऊन जाण्य़ास मिळत नसल्याने आर्थिक उत्पन्न बंद झालेले आहे. अशा परिस्थितीत काय करावे हे सुचत नसल्यामुळे सद्या हा मार्ग अवलंबिल्याचे तो सांगतो. बागायतीपासून तयार केलेली फणसवडी, कैरीचे लोणचे, सुकवलेली कैरी, भरलेल्या कैऱया त्याचप्रमाणे बागायती फळे, अननस, आंबे व इतर वस्तू रिक्षातून घरोघरी जाऊन विक्रीवर भर दिलेला आहे.
वटपोर्णिमेच्या दिवशी फळांची अल्प दरात विक्री
ग्राहकांचा वाढता प्रतिसादामुळे सद्या फोंडयात एका दुकानातून बागायती मालाची विक्री करण्यात येते. वटपोर्णिमेच्या दिवसातील फळाच्या आगाऊ घेतलेल्या आर्डरही पुर्ण न करता आल्याची खंत त्यांनी यावेळी त्यांनी व्यक्त केली. कोरोनाकाळातही आपण उदारनिर्वाहासाठी हा मार्ग अवलंबलेला आहे.वटपोर्णिमेच्या दिवशी फोंडावासियांना अल्प दरात फणस व इतर फळे उपलब्ध केल्यामुळे फोंडा नगरपालीकेचे नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी आपले खास अभिनंदनही केल्याचे त्यांनी सांगितले.