ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील काही दिवसाच्या तुलनेने नव्या रुग्णांची संख्या किंचित कमी झाली आहे. मागील 24 तासात 24 हजार 645 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 58 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 25 लाख 04 हजार 327 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 53 हजार 138 एवढा आहे.

कालच्या एका दिवसात 19, 463 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर राज्यात आतापर्यंत 22 लाख 34 हजार 330 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 2 लाख 15 हजार 241 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 89.22 % तर मृत्युदर 2.13 इतका आहे.
- मुंबईत 25 हजारपेक्षा अधिक ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबईत कालच्या दिवसात 3,260 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 10 जणांचा मृत्यू झाला. त्यासोबतच 1323 जणांना डिस्चार्ज देखील देण्यात आला. त्यामुळे आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,65,914 वर पोहचली आहे. तर 3,28,031 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मृतांची एकूण संख्या 11,592 इतकी आहे. सद्य स्थितीत 25 हजार 372 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.