ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील 24 तासात 3,081 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 50 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 19 लाख 90 हजार 759 वर पोहचली आहे. तर मृतांचा एकूण आकडा 50 हजार 738 एवढा आहे.

कालच्या एका दिवसात 2,342 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत 18 लाख 86 हजार 469 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्य स्थितीत राज्यात 52 हजार 653 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 94.75 % आहे. मृत्यू दर 2.54 % आहे.
- मुंबईत 530 नवे रुग्ण; 715 जणांना डिस्चार्ज

मुंबईत कालच्या दिवसात 530 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 715 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची एकूण संख्या 3,02,753 वर पोहचली आहे. तर 2,83,850 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कालच्या एका दिवसात 07 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर मृतांची एकूण संख्या 11,242 इतकी आहे. सद्य स्थितीत 6,772 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.