प्रतिनिधी / शाहुवाडी
कोरोना सारख्या महामारीला रोखण्याबरोबरच स्वतःच्या कुटुंबियांपासून अलिप्त राहून अहोरात्र रुग्णांना वैद्यकीय उपचार करून कोरोनाला रोखण्यात आरोग्य विभागाची महत्त्वाची भूमिका आणि मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शाहू साखरचे चेअरमन समरजितसिंह घाटगे यांनी पेरीड येथील कोविड सेंटर भेटीप्रसंगी केले येथे केले आहे.
समरजितसिंह घाटगे यांनी शाहूवाडी तालुक्याचा दौरा केला त्या प्रसंगी त्यांनी पेरीड येथील सेंटरला भेट देऊन तेथील सर्व कर्मचारी वर्गासह कोरोना कालावधीत आपले कर्तव्य बजावून रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविणार यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक वसा, व वारसा आपल्या कर्तृत्वातून तुम्ही या सर्वांनी जपला.
मी मनापासुन आपले अभिनंदन करतो. तुम्हा सर्वांच्या अथक परिश्रमामुळेच कोरोना आटोक्यात आला. विशेष करून महिला कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून कर्तृत्वाच्या खऱ्याखुऱ्या दुर्गामाता त्या ठरल्या. यावेळी कोविड योद्धा म्हणून येथील कर्मचाऱ्यांचे प्रशस्तिपत्रक देऊन त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
Trending
- जिह्याचा उत्कृष्ट विकास आराखडा सादर करा; जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांचे आवाहन
- पन्हाळा तालुक्यात धूळवाफ भात पेरणीची धांदल; अंतरमशागतीसाठी जोर
- आंबोली – माडखोल रस्त्याचे काम म्हणजे केवळ मलमपट्टीच!
- दुर्गराज रायगडवरील गाईडना मिळणार आरोग्य विम्याचे संरक्षण
- malvan :कोळंबमध्ये दोघा महिलांचा सत्कार
- sawantwadi :सैनिक मुलांच्या वसतिगृहाला माजी विद्यार्थ्यांकडून आर्थिक मदत
- भाजप कोल्हापूर शहर अध्यक्षपदाचा सस्पेन्स वाढला!
- बारसू प्रकल्पाविरोधात राज्यव्यापी आंदोलन