जिल्हाधिकाऱयांना नर्स यांचे निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपनगरांतील आरोग्य केंद्रांमध्ये नर्स म्हणून काम केले आहे. कोरोनाकाळात आम्ही कोरोना वॉरियर्स म्हणून काम केले आहे. सर्वसामान्य जनतेला सेवा दिली आहे. मात्र आता 30 नोव्हेंबर रोजी आमची मुदत संपत आहे. आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी तालुक्मयातील कंत्राटी पद्धतीने काम करणाऱया नर्सनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
कोरोनाकाळात विविध हॉस्पिटलमध्ये व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम केले आहे. जवळपास 120 हून अधिक जण आम्ही काम करत असताना अचानक कमी केले जाणार आहे. त्यामुळे आमच्यावर अन्याय होणार आहे. तेव्हा आम्हाला कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली. यावेळी महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी नर्स व कर्मचारी उपस्थित होते.