- मुख्यमंत्र्यांनी जारी केले कडक निर्बंध
ऑनलाईन टीम / चंदीगड :
कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येमुळे पंजाब मधील नागरिकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सर्व निर्बंध 31 मे पर्यंत वाढवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांनी सर्व निर्बंधांची अधिक कडकपणे अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.

- रविवारी 7,038 आढळले नवे कोरोना रुग्ण
पंजाबमधील कोरोनाची परिस्थिती भीतीदायक आहे. अनेक प्रयत्न करून देखील संसर्ग थांबायचे नाव घेत नाही आहे. मागील 24 तासात राज्यात 7,038 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 202 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 11,895 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आता पर्यंत 82,12,826 नागरिकांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यातील 4 लाख 97 हजार 705 नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर 4,10,332 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 75, 478 इतकी आहे.