कोरोनामुक्त रुग्णसंख्या 204 : जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती
प्रतिनिधी / ओरोस:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात शनिवारी आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्याला घरी पाठविण्यात आले. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱया रुग्णांच्या संख्येत भर पडली आहे. तसेच शनिवारी पॉझिटिव्ह रुग्ण न आढळल्याने कोरोना बाधित रुग्णांची संख्या 253 वर स्थिरावली आहे. कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 204 झाली असून सक्रिय रुग्णसंख्या 43 आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी शनिवारी दिली.
मालवण तालुक्मयातील सुकळवाड ठाकरवाडी येथे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तेथील 500 मीटर परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या झोनमध्ये 23 जुलै रोजी रात्री 12 वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तू विक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे-जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाहीत. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱयाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश कुडाळ प्रभारी उपविभागीय अधिकारी प्रशांत पानवेकर यांनी दिले आहेत.
तपासण्यात आलेले एकूण नमुने 4327
अहवाल प्राप्त झालेले नमुने 4271
आतापर्यंत पॉझिटिव्ह नमुने 253
निगेटिव्ह आलेले नमुने 4018
अहवाल प्राप्त न झालेले नमुने 56
सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण 43
अन्य जिल्हय़ात तपासणीसाठी गेलेले रुग्ण 1
मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 5
डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण 204
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण 75
शनिवारी तपासणी केलेल्या व्यक्ती 4122
संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13498
शासकीय संस्थांमधील अलगीकरणातील व्यक्ती 32
गाव पातळीवरील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 10889
नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 2577
2 मेपासून जिल्हय़ात आलेल्यांची संख्या 125215