ऑनलाईन टीम / बोगोटा :
कोलंबियात कोरोनाबाधितांची संख्या 7 लाखांवर पोहचली आहे. कोलंबियात आतापर्यंत 7 लाख 77 हजार 537 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 6 लाख 50 हजार 801 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.
कोलंबियात मंगळवारी 7 हजार 102 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 173 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोलंबियात 1 लाख 02 हजार 166 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 863 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 24 हजार 570 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत कोलंबियाचा जगात पाचवा क्रमांक लागतो. कोलंबियात आतापर्यंत 34 लाख 60 हजार 714 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या, भारत दुसऱ्या तर ब्राझील तिसऱ्या क्रमांकावर आहे.