ऑनलाईन टीम / कोलकाता :
पश्चिम बंगालमध्ये सीपीआयचे ज्येष्ठ नेते श्यामल चक्रवर्ती यांचे गुरुवारी निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांना 30 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, आज उपचारादरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी श्यामल चक्रवर्ती यांच्या निधनानंतर ट्विट करत दुःख व्यक्त केले. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, माजी नेते, माजी खासदार आणि बंगालचे माजी केंद्रीय मंत्री श्यामल चक्रवर्ती यांच्या निधनाने मला दुःख झाले आहे. त्यांचे परिवार, मित्र मंडळ आणि समर्थकांबद्दल मला सहानुभूती आहे.
श्यामल हे 1982 ते 1996 पर्यंत तीनवेळा वाहतूक मंत्री होते. तर दोन वेळा त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले आहे. दरम्यान, श्यामल हे पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसमुळे जीव गमावणारे दुसरे नेते आहेत. याआधी टीएमसीचे आमदार तमोनाश घोष यांचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.