प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधीतांच्या संख्येतील वाढ कायम आहे. आज, सोमवारी सकाळी १० वाजेपर्यंत २४ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले.
आज, सोमवारी 280 पैकी 256 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. तर 24 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. तर कोल्हापूरकरांनी आता सतर्क राहणे गरजचे आहे.