चार दिवसांत 12 पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 30 वर, दिवसभरात 2700 जणांची तपासणी, 1300 स्वॅब,
प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्हय़ात शुक्रवारी सायंकाळी जांभळेवाडी(ता.शाहूवाडी), जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील दोघे तरूण कोरोना पॉझिटिव्ह आले. जांभळेवाडीतील रूग्ण मुंबईतून आला आहे तर जयसिंगपूर येथील रूग्ण सोलापुरातून आल्याचे समजते. चार दिवसांत 12 जण पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय यंत्रणा हादरली आहे. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 30 वर पोहोचल्याने खळबळ उडाली आहे.
दिवसभरात शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून 717 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले, पण सायंकाळी शाहूवाडी तालुक्यातील जांभळेवाडी आणि शिरोळ तालुक्यातील जयसिंगपूर येथील 1 असे दोघे कोरोना पॉझिटिव्ह आले. शाहूवाडी तालुक्यातील पणुंब्रेपैकी जांभळेवाडी येथील तरूण (वय 30) मुंबईतून 10 रोजी कोल्हापुरात आला. 11 रोजी तो सीपीआरमध्ये तपासणीसाठी आला. त्याला इन्स्टिटय़ुशनल कोरोंटाईन केले आहे. जयसिंगपूर येथील तरूण (वय 23) सोलापुरातून आला आहे. त्याचाही स्वॅब दोन दिवसांपुर्वी घेतला होता. त्याचा स्वॅब इचलकरंजीतील आयजीएम हॉस्पिटलने पाठवला होता. त्याचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शिरोळ तालुक्यातील कोरोना बाधितांची संख्या 2 तर जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 30 वर पोहोचली आहे.
जिल्हय़ात शुक्रवारी आलेल्या 2 हजार 697 जणांची तपासणी केली. त्यापैकी 975 जणांना कोरोंटाईन पेले आहे. तसेच 1 हजार 287 जणांचे स्वॅब घेतले आहेत. सीपीआर हॉस्पिटलमध्ये 336 जणांची तपासणी करून 383 जणांचे स्वॅब घेतले. इचलकरंजीच्या आयजीएम हॉस्पिटलमध्ये 223 जणांची तपासणी करून 96 स्वॅब घेतले. कदमवाडी येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये 451 जणांची तपासणी करून 239 स्वॅब घेतले. आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये 201 जणांची तपासणी करून 22 स्वॅब घेतले. गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात 237 जणांची तपासणी करून 56 स्वॅब घेतले. चंदगड येथील कोरोना केअर सेंटरमध्ये 148 जणांची तपासणी करून 150 स्वॅब घेतले. आजरा केअर सेंटरमध्ये 862 जणांची तपासणी करून 69 स्वॅब घेतले.
राधनगरी कोव्हीड केअर सेंटरमध्ये 21 जणांचे स्वॅब घेण्यात आले. हातकणंगले केअर सेंटरमध्ये 41 जणांची तपासणी करून 11 स्वॅब घेतले. कागल केअर सेंटरमध्ये 66 जणांचे, भुदरगड ग्रामीण रूग्णालयात 58 जणांचे तर शिरोळ केअर सेंटरमध्ये 155 जणांची तपासणी करून 73 स्वॅब घेण्यात आले. हातकणंगले एसजीआय केअर सेंटरवर 246 जणांची तपासणी करून 43 स्वॅब घेतले. तर ऍस्टर आधार हॉस्पिटलमध्ये चौघांची तपासणी केली. जिल्हय़ात शुक्रवारी 1 हजार 287 जणांचे स्वॅब तपासणीसाठी आरटीपीसीआरला पाठवलें आहेत. तर तीन दिवसांपुर्वीच्या स्वॅबचे रिपोर्ट शुक्रवारी मिळाले आहेत.
बाधित शहरातून आलेले 13,869 ः त्यापैकी होम कोरोंटाईन 7,346
तपासणीसाठी आलेले स्वॅब ः 7633
निगेटिव्ह ः 4397
पॉझिटिव्ह ः 30
प्रलंबित रिपोर्ट ः 3157
नव्याने मागवलेले स्वॅब ः 11
नाकारलेले स्वॅब ः 40
खासगी लॅबमधील स्वॅब 41
निगेटिव्ह रिपोर्ट 40
सद्यस्थितीत पॉझिटिव्ह रूग्ण 30
कोरोनामुक्त झालेले रूग्ण 10
कोरोनाने मृत्यू झालेली संख्या 1
उपचार घेत असलेले रूग्ण 19