महापुरानंतर पहिल्यांदा दैनंदिन 20 हजार टेस्ट
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. त्यातील तीन मृत्यू हे शहरातील आहेत. दिवसभरात परजिल्ह्यातील मृत्यूची नोंद निरंक राहिली. दिवसभरात 418 नवे रूग्ण आढळले तर 348 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 5 हजार 729 झाली आहे. जिल्ह्यात दिवसभरात 20 हजारांवर टेस्ट झाल्याने नव्या रूग्णांसह सक्रीय रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. दुसर्या लाटेत प्रथमच कोरोना मृत्यूसंख्या एकेरी आकड्यात आली आहे. कोरोना मृत्यू कमी करण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 7 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यंत कोरोना बळींची संख्या 5 हजार 525 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 955, नगरपालिका क्षेत्रात 793, शहरात 1 हजार 195 तर अन्य 582 आहेत. दिवसभरात 348 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 85 हजार 466 झाली आहे. गेल्या 24 तासांत 813 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 12, भुदरगड 1, चंदगड 22, गडहिंग्लज 45, गगनबावडा 0, हातकणंगले 83, कागल 26, करवीर 163, पन्हाळा 113, राधानगरी 39, शाहूवाडी 75, शिरोळ 61, नगरपालिका क्षेत्रात 67, कोल्हापुरात 102 तर अन्य 4 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 96 हजार 720 झाली आहे. दिवसभरात 20 हजार 657 जणांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 16 हजारांवर ट्रुनेट टेस्ट केल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
कोल्हापूर शहरातील तिघांचा मृत्यू
परजिल्ह्यातील एकाही मृत्यूची नोंद दिवसभरात झालेली नाही. शहरात 102 नवे रूग्ण दिसून आले. कोरोनाने तिघांचा मृत्यू झाला. यामध्ये राजोपाध्येनगर, नागाळा पार्क, अयोध्या पार्क येथील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना रूग्ण : 813 एकूण : 1,96,720 कोरोनामुक्त : 348 एकूण : 1,85,466 कोरोना मृत्यू : 7 एकूण मृत्यू : 5525 सक्रीय रूग्ण : 5729