कोल्हापूर / प्रतिनिधी
राज्यातील 20 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामध्ये कोल्हापूरचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून राहूल रेखावर यांची नियुक्ती झाली आहे.
अभ्यासू विद्यार्थी ते डॅशिंग आयएएस अधिकारी अशी त्यांची वेगळी ओळख आहे. असून युपीएससी परीक्षेत 2010 मध्ये त्यांनी 15 वा रँक मिळवला होता. आयएएस झाल्यानंतर प्रथमच हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली होती. यानंतर आता त्यांची कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.