प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्या 490 कोरोना रुग्णांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 28 हजार 607 वर पोहोचली आहे. रविवारी दिवसभरामध्ये 27 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 875 वर पोहोचली आहे. तर रविवारी दिवसभरात 511 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
रविवारी रात्रीपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 2 हजार 733 प्राप्त अहवालापैकी 2 हजार 214 निगेटिव्ह तर 461 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 573 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 420 निगेटिव्ह तर 153 पॉझिटिव्ह आले. खासगी रूग्णालयामधील 240 पॉझिटिव्ह आले असे एकूण 854 अहवाल पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात रविवारपर्यंत एकूण 28 हजार 607 पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी 18 हजार 451 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवार पर्यंत 9 हजार 331 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यातील एकूण 28 हजार 607 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 18 हजार 451 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 875 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 9 हजार 331 रुग्ण उपचार घेत आहेत.
रविवारी प्राप्त झालेल्या 854 पॉझिटिव्ह अहवालात
आजरा-40, भुदरगड- 11, चंदगड- 8, गडहिंग्लज- 25, गगनबावडा – 1, हातकणंगले- 101, कागल- 28, करवीर- 85, पन्हाळा – 57, राधानगरी- 27, शाहूवाडी- 16, शिरोळ – 26, नगरपरिषद क्षेत्र – 92, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 301 तर इतर जिल्हा व राज्यातील 36 रुग्णांचा समावेश आहे.
आज अखेर तालुकानिहाय आकडेवारी
आजरा-492, भुदरगड- 643, चंदगड- 637, गडहिंग्लज- 660, गगनबावडा- 73, हातकणंगले- 3330, कागल-911 , करवीर-3135, पन्हाळा- 1011, राधानगरी- 767, शाहूवाडी- 608, शिरोळ- 1614, नगरपरिषद क्षेत्र-4935, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 9164 असे एकूण 27 हजार 980 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 863 असे मिळून एकूण 28 हजार 843 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
शहरातील मृत
74 वर्षे पुरुष नागाळा पार्क, 72 वर्षे पुरुष (फुलेवाडी), 58 वर्षीय महिला लक्षतीर्थ वसाहत, 47 वर्षीय महिला मणेरमळा, 80 वर्षीय महिला नागाळा पार्क, 75 वर्षीय पुरुष मुक्तसैनिक, 65 वर्षीय महिला सरनाईक नगर, 65 वर्षे पुरुष शिवाजी पेठ,
जिल्ह्यातील मृत
71 पुरुष नागदेवाडी (ता. करवीर), 55 वर्षीय महिला गडमुडशिंगी (ता. करवीर), 57 वर्षीय पुरुष ताकवडे (ता. शिरोळ), 88 वर्षीय पुरुष गडमुडशिंगी (ता. करवीर), 65 वर्षीय महिला (इचलकरंजी), 80 वर्षीय पुरुष (इचलकरंजी), 64 वर्षीय पुरुष गुजरी कॉर्नर (इचलकरंजी), 48 वर्षीय पुरुष खोतवाडी (ता. हातकणंगले), 75 वर्षीय महिला दत्तवाड (ता. शिरोळ), 59 वर्षीय पुरुष (कराड), 40 वर्षीय पुरुष मणेरमळा, 65 वर्षीय पुरुष बाचणी (ता. करवीर), 54 वर्षीय महिला यादवनगर (ता. शिरोळ), 58 वर्षीय पुरुष सुभाषनगर (सांगली), 64 वर्षीय पुरुष शिरोळ, 53 वर्षीय पुरुष सावरवाडी (ता. करवीर), 74 वर्षे पुरुष अब्दुललाट (ता.शिरोळ), 75 वर्षे पुरुष भेंडवडे (ता. हातकणंगले), 67 वर्षे पुरुष तिटवे (ता. राधानगरी)
कोरोनाची जिल्ह्यातील स्थिती
एकूण रुग्णसंख्या 28 हजार 607
बरे झालेले रुग्ण 18451
उपचार घेणारे रुग्ण 9331
एकूण मृत्यू 857
शहरात समूह संसर्गाचा धोका वाढला
शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. दिवसागणीक 200 ते 300 नव्या रुग्णांची भर पडत आहे. यामुळे शहरात सध्या समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. तर शहरातील मृत्यूंच्या संख्येतही वाढ होत आहे. रविवारी शहरामध्ये 290 नवे रुग्ण तर 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.