वार्ताहर/टोप
कासारवाडी ग्रामपंचायत सदस्य आनंदा खोत यांचे सदस्य पद पुणे विभागीय आयुक्त यांनी अपात्र ठरविलेल्या निर्णयाविरोधात मुंबई उच्चन्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यास न्यायालयाने स्थगिती दिल्याने आनंदा खोत यांचे सदस्य पद कायम राहिले आहे.
कासारवाडी ग्रामपंचायत सदस्यपदी खोत निवडून आल्यानंतर शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याचा ठपका ठेवत अपात्र करण्यासाठी अभयसिंह माने यांनी जिल्हाधिकार्यांकडे अर्ज केला होता. त्यानुसार खोत यांना अपात्र केले होते. यावर खोत यांनी पुणे विभागीय आयुक्त पुणे यांचेकडे याप्रकरणी आपिल केली. तेथे अपात्र ठरविले मात्र मुंबई उच्चन्यायालयात याचिका दाखल केली असता न्या.जी.एस.कुलकर्णी यांचेकडे व्हिडिओ कॉन्फरस द्वारे सुनावनी झाली. त्यामधे सदस्य अपात्रतेस स्थगिती देण्यात आली. अॅड.संदिप कोरगावे यांनी काम पाहिले. तर तक्रारदार व ग्रामपंचायत यांना बाजु मांडण्यास नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
Previous Articleकर्नाटकात शुक्रवारी नवीन ३६९३ रुग्णांची भर, ११५ जणांचा मृत्यू
Related Posts
Add A Comment