वार्ताहर / उत्रे
महाराष्ट्र राज्य उर्जा विकास अभिकरण यांच्या विशेष फंडातून जिल्हामधून निवडलेल्या तीन शाळामध्ये पन्हाळा तालुक्यातील विद्या मंदिर आळवे व उत्रे या दोन शाळेची विद्युतीकरणासाठी निवड झाली आहे. सदर योजनेतून १०० टक्के निधी उपलब्ध झाला असून महावितरण कडून प्रत्येक वर्ग खोलीसाठी सिलिंग फॅन, टयुबलाईट,एलईडी बल्ब बसविण्यात येण्यात येणार आहेत.
सदर योजनेत शाळेची निवड होण्यासाठी महाउर्जा विभागीय अधिकारी समुद्रगुप्त पाटील, संभाजी शिंदे,आळवे गावचे लोकनियुक्त सरपंच वर्षा युवराज गायकवाड, कासारी खोरा शिक्षण मंडळाचे सचिव युवराज गायकवाड ,उत्रेच्या सरपंच रंगूताई मगर ,ग्रामपंचायत सदस्य भीमराव पाटील ,पञकार व शिक्षक संजय पाटील,शरद पाटील व सर्व ग्रा.पं. सदस्य व शिक्षण समिती व सर्व शिक्षक यांचे सहकार्य लाभले.
Trending
- तळवडे येथे रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
- फौजदारी बलप्रयोग केल्याप्रकरणी दोन आरोपींना सश्रम कारावास
- भालावल येथे “एक तास राष्ट्रवादीसाठी” हा उपक्रम संपन्न
- अंबाबाई मंदिरात वडाच्या झाडाला लागली आग, महिलांना पळता भुई थोडी
- डॉ. तात्याराव लहानेंचा राजीनामा सरकारकडून मंजूर
- मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचा निकाल 100 टक्के
- डॉ दुर्भाटकर यांना सावंतवाडी सुतिकागृहात नियुक्ती द्यावी -देव्या सूर्याजी
- जिल्ह्यातील जनतेला यापुढेही डॉ. दुर्भाटकरांची सेवा मिळावी -देव्या सूर्याजी