प्रतिनिधी / कोल्हापूर
शिवाजी चौकातील इंडियन हेअर कटिंग सलूनचे मालक प्रकाश शांताराम माने यांचे वयाच्या 50 व्या वर्षी शनिवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. ते दै. ‘तरूण भारत’चे बेळगाव कार्यालयातील कर्मचारी विशाल माने यांचे वडील होत.
येथील शुक्रवार पेठेतील नागराज गल्लीत प्रकाश माने कुटुंबियांसह राहतात. त्यांचे शिवाजी चौकात इंडियन हेअर कटिंग सलून आहे. त्यांना शनिवारी दुपारी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारार्थ येथील सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. सायंकाळी उपचार सुरू असता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, नातवंडे असा परीवार आहे. रक्षाविसर्जन रविवारी 11 रोजी आहे.