प्रतिनिधी/कागल
कागल शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच मंगळवारी बाप- लेकाचा एकाच दिवशी कोरोना संसर्गाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या सहा झाली आहे .
येथील काळमावाडी वसाहतीतील ७० वर्षीय वृध्द व त्यांचा ४२ वर्षीय मुलगा या दोघांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. मुलावर कोल्हापूर येथे तर वडिलांच्यावर घरीच उपचार सुरु होते .
शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९२ झाली असून यातील ३८ जण बरे झाले आहेत. ३० जणांच्यावर उपचार सुरु असून १८ जणांवर घरी उपचार सुरु आहेत. मृत्यूंची संख्या ६ झाली आहे. एकाच दिवशी बाप – लेकाच्या मृत्यने हळहळ व्यक्त होत आहे .