चंदूर / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील चंदुर गावात दिवसेंदिवस कोरोणाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे गाव कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. अशा परिस्थितीत गावातील 3 व्यक्तींचा मृत्यूही झाला आहे. तरीही या परिस्थितीचे गांभीर्य चंदुर ग्रामपंचायतीला समजत नसल्याचे दिसते, कारण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असलेले पॉझिटिव्ह रुग्ण गावात येऊन राजरोसपणे फिरून परत हॉस्पिटल जात आहेत. गावात कित्येक ठिकाणी पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर संबंधित परिसर सील केला जात नाही व त्या परिसराचे निर्जंतुकीकरण केले जात नसल्याची तक्रार नागरिकांतून येत आहे.
पंचगंगा नदीचे पाणी गावातील नागरी वस्तीत येऊन गेल्याने त्या ठिकाणच्या परिसरात मोठ्या प्रमाणात नदीतील कचरा साठला आहे व तो कचरा कुजून त्याची दुर्गंधी पसरत आहे. आज चंदुर मधील कोरोनो पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 76 वर गेली आहे. त्यातील 38 जण बरे होऊन घरी आले असून दवाखान्यात 34 जण उपचार घेत आहेत. तर घरी एकजण उपचार घेत आहे. आत्तापर्यंत एकूण तीन जण मयत झाले आहेत तर अजून 15 जणांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत.
Trending
- स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने आपत्तीचा करणार मुकाबला
- अगोदर गॅरंटी आता नियम व अटी!
- कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात, तरीही कडेकोट पोलीस बंदोबस्त; पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांची माहिती
- बिगरपरवाना दारू वाहतूक प्रकरणी एकास शिक्षा
- सर्व समाजातील लोकांनी सामाजिक सलोखा राखावा : शाहू छत्रपती महाराज
- kolhapur Breaking : बालिंगा येथे सराफाच्या दुकानावर फिल्मी स्टाईल सशस्त्र दरोडा
- ‘मोपा’ सर्वाधिक महसुलाचा प्रकल्प
- ‘ऑनलाईन लूटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश