520 नवे रूग्ण, 425 रूग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 29 हजार 363 वर
सीपीआरमधील वैद्यकीय अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, गडहिंग्लज तालुक्यातील 4 वर्षीय बालकाचा कोरोनाने मृत्यू
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात सोमवारी गेल्या 24 तासांत कोरोनाने 32 जणांचा मृत्यू झाला. तसेच 425 रूग्ण कोरोनामुक्त झाले, तसेच 520 नवे रूग्ण दिसून आले. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 29 हजार 363 झाली असून ती 30 हजारांपर्यत पोहोचली आहे तर कोरोना बळींची संख्या 907 वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. दरम्यान, सीपीआरमधील वैद्यकीय अधिकारी डॉ. बर्गे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तसेच दिवसभरातील 425 कोरोनामुक्त रूग्णांमुळे कोरोनामुक्तांची संख्या 18 हजार 876 वर पोहोचली आहे.
जिल्हय़ात सोमवारी गेल्या 24 तासांत 1 हजार 562 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 1 हजार 470 जणांचे स्वॅब घेण्यात आले. तसेच 723 जणांची ऍटीजेन टेस्ट करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्हय़ात 9 हजार 580 रूग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. दरम्यान, सोमवारी सायंकाळपर्यत कोरोनाने 32 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये रेंदाळ येथील 79 वर्षीय पुरूष, येळवडे राधानगरी येथील 47 वर्षीय महिला, बोरवडे कागल येथील 58 वर्षीय पुरूष, गडमुडशिंगी येथील 88 वर्षीय पुरूष, कणेरी करवीर येथील 60 वर्षीय पुरूष, वडणगे येथील 65 वर्षीय पुरूष, अब्दुललाट शिरोळ येथील 50 वर्षीय पुरूष, एकोंडी कागल येथील 57 वर्षीय पुरूष, शहरातील मार्केट यार्ड येथील 53 वर्षीय पुरूष, मंगळवार पेठ मंगेशकरनगर येथील 45 वर्षीय पुरूष, मंगळवार पेठेतील 74 वर्षीय पुरूष, विचारे माळ येथील 55 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला.
इचलकरंजी येथील आयजीएम हॉस्पिटलमध्ये खोतवाडी येथील 70 वर्षीय महिला, कबनूर येथील 60 वर्षीय पुरूष, सावली सोसायटीतील 65 वर्षीय महिला, हुलगेश्वरी रोडवरील 72 वर्षीय पुरूषाचा मृत्म्यू झाला. अतिग्रे येथील केअर सेंटरमध्ये इचलकरंजी येथील 62 वर्षीय पुरूष, संभाजीपूर शिरोळ येथील 83 वर्षीय पुरूष, तासगाव सांगली येथील 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शहरातील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये गांधीनगर येथील 22 वर्षीय पुरूष, हुक्केरी कर्नाटक येथील 83 वर्षीय पुरूष, मुक्त सैनिक वसाहतीतील 58 वर्षीय महिला, शाहूपुरीतील 74 वर्षीय महिला, फुलेवाडी येथील 71 वर्षीय पुरूष, रविवार पेठेतील 83 वर्षीय पुरूष, साने गुरूजी वसाहतीतील 73 वर्षीय पुरूष, गावभाग इचलकरंजी येथील 71 वर्षीय पुरूष, शिंगणापूर करवीर येथील 63 वर्षीय पुरूष, मुत्नाळ गडहिंग्लज येथील 4 वर्षीय बालक, ताराबाई पार्क येथील 61 वर्षीय पुरूष, यड्राव शिरोळ येथील 70 वर्षीय पुरूष, राजापूर शिरोळ येथील 60 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोना बळीची संख्या 907 वर पोहोचली आहे.
जिल्हय़ात गेल्या 24 तासांत आजरा 10, भुदरगड 15, चंदगड 16, गडहिंग्लज 5, गगनबावडा 5, हातकणंगले 84, कागल 32, करवीर 46, पन्हाळा 34, राधानगरी 17, शाहूवाडी 29, शिरोळ 10, नगरपालिका 76, कोल्हापूर शहर 136 आणि अन्य 5 असे 520 रूग्ण दिसून आले. पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 29 हजार 363 झाली आहे. स्वॅबचे 1 हजार 199 रिपोर्ट आले, त्यापैकी 957 निगेटिव्ह तर 212 पॉझिटिव्ह आले, ऍटीजेनचे 723 रिपोर्ट आले, त्यापैकी 533 निगेटीव्ह तर 190 पॉझिटिव्ह असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली.
आतापर्यंतची कोरोनाची स्थिती
एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 29363
बरे झालेले 18876
उपचारात 9580
एकूण बळी 907