वार्ताहर / खोची
कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मधून पेठ वडगाव मंडल कार्यालयाकडील पूरग्रस्त गावासाठी एक यांत्रिकी रबरी बोट, दहा लाईफ जॅकेट,२ लाइफ रिंग आदी. साहित्य उपलब्ध करुन दिले आहे.
त्यामध्ये पेठ वडगाव मंडलातील खोची, भेंडवडे, बुवाचे वठार, लाटवडे, भादोले या प्रामुख्याने पाच पूरबाधित होणाऱ्या गावांमध्ये या बोटीचा वापर करण्यात येणार आहे. सदर बोटीचा प्रात्यक्षिक कार्यक्रम आज रविवारी दुपारी भेंडवडे येथे वारणा नदीच्या पाण्यामध्ये जीवनज्योत रेस्क्यू फोर्स, आळते, कोल्हापूर टीमच्या सहकार्याने मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप यांनी पुढील आठवड्यात हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली तर सदर बोटीचा वापर करण्यात येणार असून पूर बाधित नागरिकांनी आतापासूनच सुरक्षितस्थळी जावून प्रशासनाला सहकार्य करावे.असे आवाहन केले.
यावेळी हातकणंगले निवासी नायब तहसीलदार दिगंबर सानप, वडगाव मंडल अधिकारी गणेश बर्गे, भेंडवडे सरपंच काकासाहेब चव्हाण, तलाठी रविंद्र कांबळे, सुरेश खोत, ग्रामपंचायत सदस्य सुहास देसाई, डॉ.संजय देसाई, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, हणमंत पोवार, कोतवाल नितीन कोळी आधीसह मान्यवर, नागरिक उपस्थित होते.
Trending
- फोंडा तालुक्याला मोन्सूनपूर्व दिलासा
- मणिपूर हिंसाचारप्रकरणी शांतता समिती स्थापन
- आजपासून महिलांना मोफत बसप्रवास
- हिरवी मिरची, टोमॅटो, कोथिंबीर दर वधारला
- भेंडी, टोमॅटोचे दरात वाढ, लिंबू जैसे थे !
- पावसाअभावी नदी-नाले, विहिरी कोरड्याच
- भाजपच्या दक्षिण गोव्यातील ‘विकास तीर्थ यात्रे’ला प्रारंभ
- पिस्टल विक्री करण्यास आलेला गजाआड