प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात गुरूवारी कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाला तर 69 नवे रूग्ण समोर आले. दिवसभरात 380 जण कोरोनामुक्त झाले. सद्यस्थितीत कोरोनामुक्तांची संख्या 42 हजार 137 झाली आहे. दिवसभरात 490 संशयितांची तपासणी केली. त्यापैकी 199 जणांची अँटीजेन टेस्ट केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली. भुदरगड, गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यात गुरूवारी एकही नवा रूग्ण नोंद झालेला नाही.
जिल्ह्यात गुरूवारी सीपीआर, केअर सेंटरमध्ये 490 जणांची तपासणी केली. सध्या 3 हजार 408 रूग्ण उपचार घेत आहेत. शेंडा पार्क येथील लॅबमधून 600 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 561 निगेटिव्ह तर 20 पॉझिटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 199 रिपोर्ट आले. त्यापैकी 18
पॉझिटिव्ह आहेत.
जिल्ह्यात कोरोनाने 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सीपीआर हॉस्पिटलमध्ये सुभाष चौक कागल येथील 82 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला तर खासगी हॉस्पिटलमध्ये वाघापूर भुदरगड येथील 74 वर्षीय पुरूष, शिरोळ येथील 55 वर्षीय महिला, भिवशी चिक्कोडी बेळगाव येथील 61 वर्षीय पुरूष आणि गुलेवाडी निपाणी बेळगाव येथील 55 वर्षीय पुरूष पुरूषाचा मृत्यू झाला.
कोरोनाने आजपर्यत 1 हजार 582 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ग्रामीण भागात 766, नगरपालिका क्षेत्रात 333, महापालिका क्षेत्रात 352 तर अन्य 131 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासांत 380 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 42 हजार 137 झाली आहे. आजरा 2, चंदगड 5, गडहिंग्लज 2, हातकणंगले 12, कागल 4, करवीर 6, पन्हाळा 2, शिरोळ 4 नगरपालिका क्षेत्रात 6, कोल्हापूर शहर 13 आणि अन्य 13 असे 69 रूग्ण असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
Previous Articleसिध्दवाडीच्या महापुरात माकडासाठी माणुसकीची धडपड
Next Article ‘बांधकाम’ च्या बँक खाते जप्तीचे आदेश
Related Posts
Add A Comment