प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 690 झाली आहे. गेल्या 24 तासांत 14 नवे रूग्ण दिसून आले. तसेच 28 जण कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 366 जणांची तपासणी केल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विलास देशमुख यांनी दिली.
जिल्ह्यात मंगळवारी सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोनाने शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर येथील 46 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शाहूवाडी तालुक्यातील केअर सेंटरमध्ये मलकापूर येथील 57 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये आजरा तालुक्यातील निडुंगे येथील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोनाने 1,690 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 836, नगरपालिका क्षेत्रात 345, शहरात 362 तर अन्य जिल्ह्यातील 147 जणांचा समावेश आहे. सध्या 234 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 366 जणांची तपासणी केली. त्यातील 111 जणांची ऍटीजेन टेस्ट केली.
शेंडा पार्क येथील लॅबमधून मंगळवारी 466 जणांचे रिपोर्ट आले. त्यापैकी 444 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 111 रिपोर्ट आले. त्यातील 108 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 166 रिपोर्ट आले, त्यापैकी 158 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 3, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 1, हातकणंगले 1, कागल 0, करवीर 0, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 1, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 1, कोल्हापूर शहर 3 आणि अन्य 3 असे 14 रूग्ण आहेत. दिवसभरात 28 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 276 झाली आहे. नव्या 14 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्ण संख्या 49 हजार 200 झाल्याची माहिती डॉ. देशमुख यांनी दिली.
Previous Articleकोल्हापूर जिल्ह्यातील सरपंच पदासाठी आरक्षण कार्यक्रम जाहीर
Related Posts
Add A Comment