प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी गेल्या 24 तासांत 8 नवे रूग्ण दिसून आले. त्यामध्ये शहरातील 5 रूग्ण आहेत. दिवसभरात 10 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात गुरूवारी 8 नवे रूग्ण मिळाले. दिवसभरात 634 जणांची तपासणी केली. तसेच 10 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 277 झाली आहे. नव्या 10 रूग्णांमुळे कोरोना रूग्णसंख्या 50 हजार 140 झाली आहे. दरम्यान, शेंडा पार्क येथून गुरूवारी आलेल्या 804 रिपोर्टपैकी 793 निगेटिव्ह आहेत. एँटीजेनचे 84 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 79 रिपोर्ट आले. त्यापैकी 77 निगेटिव्ह आहेत. जिह्यात सध्या 132 सक्रीय रुग्ण आहेत. 8 नव्या रूग्णांत शहरातील 5, कागल 1 आणि गडहिंग्लज तालुक्यातील दोघांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
जिल्ह्यात 8 नवे रूग्ण, 10 कोरोनामुक्त
पॉझिटिव्ह रूग्ण 8, कोरोनामुक्त 10, कोरोना मृत्यू 0
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 50 हजार 140
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 48 हजार 277
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 132
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1731
गेल्या 24 तासांत 634 संशयितांची तपासणी