कोरोना मृत्यू 20, नवे रूग्ण 852, कोरोनामुक्त 1094, जिल्ह्यात मृत्यू, नवे रूग्ण, सक्रीय रूग्णांत घट, गगनबावडा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी नवी रूग्ण नोंद शुन्य
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 20 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 852 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 94 कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 13 हजार 179 झाली आहे. शनिवारी रूग्णसंख्या 1 हजारांच्या खाली होती, त्यानंतर सोमवारी दुसऱयांदा हा आकडा 1 हजारांखाली आला आहे. कोरोना मृत्यू, नवे रूग्ण, सक्रीय रूग्णांत घट झाली आहे. गगनबावडा तालुक्यात सलग दुसऱया दिवशी नव्या रूग्णांची नोंद शुन्य राहिली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 20 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 264 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 841, नगरपालिका क्षेत्रात 744, शहरात 1 हजार 122 तर अन्य 557 आहेत. दिवसभरात 1 हजार 94 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 70 हजार 179 झाली आहे. गेल्या 24 तासांत 852 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 24, भुदरगड 20, चंदगड 7, गडहिंग्लज 57, गगनबावडा 0, हातकणंगले 90, कागल 41, करवीर 158, पन्हाळा 51, राधानगरी 46, शाहूवाडी 15, शिरोळ 59, नगरपालिका क्षेत्रात 87, कोल्हापुरात 190 तर अन्य 7 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 88 हजार 922 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी 17 हजार 44 अहवाल आले. त्यापैकी 16 हजार 191 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 4 हजार 80 अहवाल आले. त्यातील 3 हजार 945 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 184 अहवाल आले. त्यातील 2 हजार 907 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 9 हजार 780 रिपोर्ट आले. त्यातील 9 हजार 339 निगेटिव्ह आहेत.
शहरातील तिघांचा कोरोनाने मृत्यू
जिल्ह्यातील 20 मृत्यूंमध्ये परजिल्ह्यातील मृत्यूची संख्या शुन्य आहे तर कोल्हापूर शहरातील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये कसबा बावडा, मंगळवार पेठ, साईक्स एक्स्टेंशन येथील व्यक्तींचा समावेश आहे.
कोरोना रूग्ण : 852 एकूण : 1,88,922
कोरोनामुक्त : 1094 एकूण : 1,70,179
कोरोना मृत्यू : 20 एकूण मृत्यू : 5264
सक्रीय रूग्ण : 13179