प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात आज, सोमवारी रात्री दहा वाजेपर्यंत तीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यात गडहिंग्लज तालुक्यातील जांभुळवाडी येथील ४८ वर्षे पुरुष चंदगड तालुक्यातील कागणी येथे ६५ वर्षीय पुरुष आणि तालुक्यातील सु येथील ५६ वर्षे ५६ तर कोल्हापूर शहरातील कणेरकर नगर येथील ५२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या ७४१ वर पोहोचली आहे.
दिलासादायक बाब म्हणजे आज १५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असले तरी कोरोनामुक्त रुग्णांनामध्ये वाढ होत आहे. यामुळे सध्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.