नववर्षांत पहिल्याच दिवशी 7 नवे रूग्ण, 15 कोरोनामुक्त, सक्रीय रूग्णसंख्या 40 च्या खाली
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी खासगी हॉस्पिटलमध्ये शहरातील एसएससी बोर्ड परिसरातील 64 वर्षीय पुरूष, मोहिते पार्क येथील 61 वर्षीय महिला आणि कागल तालुक्यातील हमीदवाडा येथील 96 वर्षीय वृद्धाचा कोरोनाने मृत्यू झाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोरोनाचे 3 बळी गेले. गेल्या 24 तासांत 7 नवे रूग्ण दिसून आले. तर 15 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 226 जणांची तपासणी केली. सक्रीय रूग्णसंख्या 39 असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने शहरातील एका महिलेसह दोघांचा तर कागल तालुक्यातील एकाचा मृत्यू झाला. आजपर्यंत केरोनाने 1 हजार 708 जणांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात 841, नगरपालिका क्षेत्रात 347, शहरात 367 तर अन्य 153 जणांचा समावेश आहे. सध्या 39 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 226 जणांची तपासणी केली. त्यातील 152 जणांची ऍटीजेन टेस्ट केली.
शेंडा पार्क येथील लॅबमधून शुक्रवारी 1 हजार 544 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 1 हजार 523 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 152 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 57 रिपोर्ट आले, त्यापैकी 52 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 1, करवीर 1, पन्हाळा 1, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 2 व अन्य 2 असे 7 रूग्ण आहेत. दिवसभरात 15 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 47 हजार 787 झाले. नव्या 7 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 534 झाल्याची माहिती डॉ. माळी यांनी दिली.
पॉझिटिव्ह रूग्ण 7, कोरोनामुक्त 15, कोरोना मृत्यू 3
आजपर्यतचे कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ः 49 हजार 534
आजपर्यतचे कोरोनामुक्त रूग्ण ः 47 हजार 787
सध्या उपचार घेत असलेले कोरोना रूग्ण ः 39
आजपर्यतचे एकूण कोरोना बळी ः 1708
गेल्या 24 तासांत 226 संशयितांची तपासणी