प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने मृत्यूची नोंद निरंक राहिली, पण गेल्या 24 तासांत 16 नवे रूग्ण दिसून आले. त्यामुळे आजपर्यतची रूग्णसंख्या 49 हजार 989 झाली आहे. शनिवारी जिल्हÎातील आजपर्यतची कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 50 हजारांवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, 15 दिवसांनंतर पुन्हा सक्रीय रूग्णसंख्या 104 वर पोहोचली आहे. त्यामुळे लसीकरण सुरू असतानाही कोरोनाचा धोका वाढला आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी कोरोना मृत्यू नोंद निरंक राहिल्याने बळींची संख्या 1727 आहे. ग्रामीण भागात 849, नगरपालिका क्षेत्रात 348, शहरात 375 तर अन्य 155 जणांचा समावेश आहे. शुक्रवारी 16 नवे रूग्ण दिसून आले तर 6 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 104 सक्रीय रूग्ण आहेत. दिवसभरात 414 जणांची तपासणी केली. शेंडा पार्क येथील लॅबमधून शुक्रवारी 946 जणांचे रिपोर्ट आले. त्यातील 929 निगेटिव्ह आहेत. ऍटिजेंन टेस्टचे 65 रिपोर्ट आले. त्यातील 64 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेटचे 116 रिपोर्ट आले, त्यापैकी 104 निगेटिव्ह आहेत. गेल्या 24 तासांत आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 1, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 0, कागल 0, करवीर 1, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 0, कोल्हापूर शहर 12 व अन्य 2 असे 16 रूग्ण आहेत. दिवसभरात 6 जणांना डिसचार्ज मिळाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 158 झाले. नव्या 14 रूग्णांमुळे पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 49 हजार 989 झाली आहे, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
Trending
- राज्यात मंत्रीपदसह आठवले यांनी लोकसभेसाठी केला इतक्या जागांवर दावा
- ‘आय.एस.ओ मानांकित’ समाज कल्याण कार्यालयामध्ये शिवराज्याभिषेक दिन साजरा
- भीमा- कोरेगाव प्रकरणात फडणवीस यांना चौकशीला बोलवा; प्रकाश आंबेडकरांची मागणी
- पुणे शहरातून एकाचवेळी 12 गुन्हेगार तडीपार
- मेट्रोचे साहित्य चोरणाऱ्या महिलांसह पाच जण अटकेत
- हेमंत निंबाळकर यांची माहिती व जनसंपर्क विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती
- अरबी समुद्रात चक्रीवादळाची स्थिती; मान्सून लांबणार
- शिक्षण विभागातील लाचखोर अधिकाऱ्यांची उघड चौकशी करावी