विठ्ठल बिरंजे/कोल्हापूर
कर्जमाफी आणि कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली मात्र यातील नामनिर्देनपत्र दाखल करण्यास सुरुवात झालेल्याच संस्थांची निवडणूक `आहे त्या टप्प्यावरुन’ पुढे सुरु राहणार आहे. या टप्प्यावर केवळ 31 संस्था आहेत. तर पहिल्या टप्प्यातील अन्य 593 संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेचे `पुनश्च हरीओम’ करावे लागणार आहे. 20 सप्टेंबर पासून ही प्रक्रिया सुरु होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भावा कमी झाल्यानंतर राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश सहकार विभागाने काढले. त्यामुळे राज्यातील 65 हजार तर जिल्हÎातील 4132 संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. 20 सप्टेंबर पासून पहिला टप्पा सुरू होणार आहे. जिल्हÎातील 624 संस्थांचा यामध्ये समावेश आहे. नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या टप्प्यावर स्थगिती मिळालेल्या संस्थांना शासन निर्णयानुसार `आहे त्या’ टप्प्यावरुन निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना केल्या आाहेत. तर उर्वरीत संस्थांच्या सभासद मतदार यादीत बदल करण्यास मुभा दिली आहे. मतदानास पात्र सभासदांचा प्रारुप यादीत समावेश करुन नव्याने यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
कर्जमाफी, कोरोनाने मिळाली संधी
अनेक संस्थांमध्ये पात्र असून तांत्रिक अडचणीमुळे काही संस्था, शेअरधारकांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. याबाबत काही संस्थांनी सहकार विभागाकडे तक्रार केली होती. मात्र कोरोना कारणामुळे टप्प्याटप्प्याने निवडणुका लांबणीवर पडत गेल्याने दुर्लक्ष झाले. निवडणूक लांबणीवर पडलेल्या दोन वर्षाच्या काळात पोटनियमानुसार मतदानासाठी पात्र असलेल्या सभादांना मतदार यादीत समाविष्ठ करावे, अशी मागणी पुन्हा जोर धरली. नुकत्याच काढण्यात आलेल्या आदेशानुसार आता सुधारीत प्रारुप यादी प्रसिद्ध होणार असल्याने 593 संस्थांच्या कार्यक्षेत्रातील पात्र सभादांना मतदानाचा हक्क मिळणार आहे. महात्मा फुले शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रथम राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणूका तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पाठोपाठ सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या. तोपर्यंत कोरोना महामारीमुळे सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या. आतापर्यंत पाच ते सहावेळा या निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. शासनाचा हाच निर्णय निवडणूक प्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या सभासदांच्या पथ्यावर पडला आहे.
पहिल्या टप्प्यातील संस्था
वर्ग संस्थांची संख्या
अ – 12
ब – 223
क – 190
ड – 199
एकुण – 624
पहिला टप्पा
एकुण संस्था 624
प्रारुप यादी प्रसिद्ध 624
अंतिम यादी प्रसिद्ध 279
निवडणूक अधिकारी नियुक्त 188
निवडणूक कार्यक्रम मंजूर 120
नामनिर्देनपत्र सुरवात