सक्रीय रूग्णसंख्या पोहोचली 223 वर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात गुरूवारी कोरोना मृत्यूची नोंद निरंक राहिली. पण 24 तासांत कोरोनाचे 51 रूग्ण दिसून आले. त्यातील 50 टक्के रूग्ण शहरातील आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रूग्ण आढळून आले आहेत. सक्रीय रूग्णसंख्या 223 वर पोहोचली तर 15 कोरोनामुक्त झाले. दिवसभरात 1 हजार 299 जणांची तपासणी केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात गुरूवारी कोरोना मृत्यू निरंक राहिल्याने कोरोना बळींची संख्या 1 हजार 741 राहिली आहे. यामध्ये ग्रामीण भागात 851, नगर पालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 383 तर अन्य जिल्हÎांतील 158 आहेत. दिवसभरात 15 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 48 हजार 373 झाली आहे. सध्या जिल्ह्यात 223 सक्रीय रूग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत कोरोनाचे 51 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 1, भुदरगड 1, चंदगड 2, गडहिंग्लज 4, गगनबावडा 2, हातकणंगले 0, कागल 1, करवीर 2, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 2, नगरपालिका क्षेत्रात 2, कोल्हापूर शहरात 24 तर अन्य 10 जणांचा समावेश आहे. गुरूवारी 1299 जणांची तपासणी केली. त्यातील 202 जणांची ऍटीजेन टेस्ट केली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून गुरूवारी 1604 रिपोर्ट आले. त्यापैकी 1554 निगेटिव्ह आहेत. अँटीजेन टेस्टचे 78 रिपोर्ट आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 274 रिपोर्ट आले. त्यापैकी 242 निगेटिव्ह आहेत. सक्रीय रूग्णांत 36 जणांची वाढ झाल्याने ही संख्या 223 वर पोहोचल्याचे डॉ. माळी यांनी सांगितले.
कोरोना रूग्ण : 51 (एकूण – 50,337)
कोरोनामुक्त : 15 (एकूण – 48,373)
कोरोना मृत्यू : 0 (एकूण मृत्यू – 1,741)
सक्रीय रूग्ण – 223 : 24 तासांत 1299 जणांची तपासणी