25 मृत्यू, 1065 नवे रूग्ण, 1751 कोरोनामुक्त, कोरोनामुक्तांत वाढ, सक्रीय रूग्णसंख्येमध्ये घट
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात मंगळवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाचे 25 जणांचा मृत्Îू झाला. दिवसभरात 1 हजार 35 नवे रूग्ण आढळले तर 1 हजार 751 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 12 हजार 765 झाली आहे. जिल्ह्यात कालच्या तुलनेत मंगळवारी नव्या रूग्णांत 50 टक्क्यांनी घट झाली आहे. सक्रीय रूग्णसंख्येत 700 ने घट झाली आहे. कोरोना मृत्Îूची संख्या मात्र स्थिर राहिली आहे.
जिल्ह्यात मंगळवारी कोरोनाने 25 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 5 हजार 111 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 755, नगरपालिका क्षेत्रात 716, शहरात 1 हजार 81 तर अन्य 549 आहेत. दिवसभरात 1 हजार 751 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 61 हजार 144 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 35 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 5, भुदरगड 32, चंदगड 6, गडहिंग्लज 20, गगनबावडा 2, हातकणंगले 115, कागल 36, करवीर 208, पन्हाळा 72, राधानगरी 27, शाहूवाडी 14, शिरोळ 69, नगरपालिका क्षेत्रात 112, कोल्हापुरात 302 तर अन्य 15 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 79 हजार 220 झाली आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून मंगळवारी 13 हजार 239 अहवाल आले. त्यापैकी 12 हजार 199 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 3 हजार 422 अहवाल आले. त्यातील 3 हजार 236 †िनगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 3 हजार 511 अहवाल आले. त्यातील 3 हजार 222 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 6 हजार 306 रिपोर्ट आले. त्यातील 5 हजार 741 निगेटिव्ह आहेत.
कोरोनाने मृत्यू
परजिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील एकाचा तर कोल्हापूर शहरातील 8 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील कोरोना मृत्यूंमध्ये कसबा बावडा, सुभाषनगर, अयोध्या टॉवर, महाद्वार रोड, शिवाजी पेठ, सदर बाजार, मानसमुर्ती अपार्टमेंट टाकाळा, पाटील कॉलनी सुभाषनगर येथील व्यक्तींचा समावेश आहे.
विशेष लसीकरण मोहिमेतंर्गत दिव्यांगाना लस
जिह्यातील सर्व तालुक्यामध्ये विशेष लसीकरण मोहिमेतंर्गत 834 दिव्यांगाना लस दिल्याची माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. आजपर्यंत शिक्षणासाठी परदेशी जाणाऱया 164 विद्यार्थ्यांचे, परदेशी जाणाऱया 142 नागरिकांचे तसेच 23 तृतीय पंथीयांचे ही विशेष लसीकरण मोहिमेतंर्गत लसीकरण करण्यात आले.
दिव्यांगासाठी प्रत्येक सोमवारी तालुक्याच्या ठिकाणी सकाळी 10 ते 2 या वेळेत विशेष कॅम्प आयोजन करण्यात येत आहे. उर्वरीत दिव्यांगांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिह्यातील 78 गावांत 100 टक्के लसीकरण पूर्ण
जिह्यातील 78 गावांमध्ये 45 वर्षावरील लाभार्थ्याचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित गावांचेही 100 टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात येत आहे. या 78 गावांमधील 33 गावांमध्ये कोरोनाचे 0 रुग्ण, 30 गावात 5 पेक्षा कमी, 9 गावांमध्ये 10 पेक्षा कमी तर 6 गावांत 10 पेक्षा अधिक बाधित आहेत. या गावांनी नियोजनबद्धरित्या प्रयत्न केल्यामुळे केवळ 244 इतके रुग्ण आढळले आहेत. लवकरच हे रुग्ण बरे होतील. इतर गावांनीही कोरोनाला गावच्या वेशीवर थोपवून धरावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
कोरोना रूग्ण : 1035 एकूण : 1,79,220
कोरोनामुक्त : 1751 एकूण : 1,61,344
कोरोना मृत्यू : 25 एकूण मृत्यू : 5111
सक्रीय रूग्ण : 12765