प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे 30 रूग्ण दिसून आले तर 41 कोरोनामुक्त झाले. सध्या 361 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात कोरोना बळी निरंक राहिल्याने बळींची संख्या 1746 झाली आहे. दिवसभरात 41 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 557 झाली आहे. रविवारी गेल्या 24 तासांत कोरोनाचे 30 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 1, चंदगड 0, गडहिंग्लज 0, गगनबावडा 0, हातकणंगले 1, कागल 1, करवीर 3, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 6, कोल्हापूर शहरात 17 तर अन्य 1 जणांचा समावेश आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून रविवारी आलेल्या 799 अहवालापैकी 713 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 105 अहवाल आले. त्यातील 100 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टिंगच्या 224 रिपोर्ट आले. त्यातील 204 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 664 आहेत. त्यापैकी 48 हजार 557 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर जिह्यात 361 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
सक्रीय रूग्णसंख्या 361
कोरोना रूग्ण 30 ः एकूण ः 50664
कोरोनामुक्त 41 ः एकूण ः 48557
कोरोना मृत्यू ः0 एकूण मृत्यू ः 1746
सक्रीय रूग्ण ः 361