प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हय़ात आज कोरोनाचे 5 जणांचा मृत्यू झाला, मृतांमध्ये जिल्हय़ातील 3 तर दोघे सांगलीतील आहेत. दिवसभरात 110 रूग्ण मिळून आले तर 60 जण कोरोनामुक्त झाले. सक्रीय रूग्णसंख्या 889 झाली आहे. सलग दुसऱया दिवशी कोरोनाच्या नव्या रूग्णसंख्येने शंभरी ओलांडली आहे.
जिल्हय़ात सीपीआर हॉस्पिटलमध्ये करवीर तालुक्यातील भुये येथील 80 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. इचलकरंजी येथील अलायन्स हॉस्पिटलमध्ये इचलकरंजी तांबे मळा येथील 60 वर्षीय महिलेचा तर आयजीएम हॉस्पिटलमध्ये हातकणंगले कोळी गल्लीतील 54 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोल्हापुरातील कदमवाडी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये सांगली जिल्हय़ातील चुकर्डे (ता. वाळवा) येथील 78 वर्षीय पुरूष व नागाळा पार्क येथील खासगी हॉस्पिटलमध्ये शिराळा तालुक्यातील तडवळे येथील 56 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
दिवसभरात कोरोनाने 2 महिलांसह पाच जणांचा बळी घेतल्याने कोरोना मृत्यू संख्या 1 हजार 777 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 864, नगरपालिका क्षेत्रात 352, कोल्हापूर शहरात 393 तर अन्य 168 जणांचा समावेश आहे. तसेच 60 जण कोरोनामुक्त झाल्याने कोरोनामुक्तांची संख्या 49 हजार 626 झाली आहे. गेल्या 24 तासांत 110 नवे रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 1, भुदरगड 3, चंदगड 0, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 5, कागल 2 करवीर 9, पन्हाळा 4, राधानगरी 2, शाहूवाडी 1, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 19 कोल्हापुरात 45 तर अन्य 17 जणांचा समावेश आहे. कोरोना रूग्णांची एकूण संख्या 52 हजार 292 झाली आहे.
जिल्हय़ात शुक्रवारी 1218 जणांची तपासणी केली. त्यातील 181 जणांची अॅटीजेन टेस्ट केली. शेंडा पार्क येथून आलेल्या 827 अहवालापैकी 775 निगेटिव्ह आहेत. अॅन्टीजेन टेस्टचे 144 अहवाल आले. त्यातील 135 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 255 रिपोर्ट आले. त्यातील 191 निगेटिव्ह आहेत. सध्या 889 रुग्ण उपचार घेत आहेत. शहरात 376 तर ग्रामीण भागात 147 जणांना होम कोरोंटाईन केल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
कोरोना आकडेवारी
2/4/2021
कोरोना रूग्ण : 110
एकूण कोरोना रूग्ण : 52292
कोरोनामुक्त : 60
एकूण कोरोनामुक्त : 49626
कोरोना मृत्यू : 5
एकूण कोरोना मृत्यू : 1777
सक्रीय रूग्ण : 889
Previous Articleशिंगणापूर येथे क्रशर खणीत बुडून एकाचा मृत्यू
Next Article रायगडवर सापडली शिवकालीन सोन्याची बांगडी
Related Posts
Add A Comment