कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 10 वर
प्रतिनिधी / कोल्हापूर
कंटेनरमधील सांताप्रुझ (मुंबई) येथील पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णासोबत आलेल्या महिलेचा स्वॅब रिपोर्ट सोमवारी पॉझिटिव्ह आला. इचलकरंजी येथे सर्व्हे तपासणीत संशयित लक्षणे आढळून आलेल्या पुरूषाचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हय़ातील पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 10 झाली आहे. सकाळपर्यत मिळालेले 36 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अद्यापी काही रिपोर्ट प्रलंबित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
मुंबईतील सांताप्रुझ, हनुमान टेकडी परिसरातील 30 जण शुक्रवारी कर्नाटकातील कंटेनरने गावी निघाले होते. शुक्रवारी मध्यरात्री पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर चोरटी वाहतूक करून कर्नाटकला निघालेल्या या कंटेनरला पोलिसांनी किणी टोल नाक्यावर ताब्यात घेतले. या कंटेनरमध्ये काही महिलांसह 30 जण होते. या सर्वांची सीपीआरमध्ये तपासणी करून त्यांचे स्वॅब घेतले होते. कंटेनरमधील 11 जणांचे स्वॅब रिपोर्ट काल मिळाले. त्यात कर्नाटकातील हसन येथील 57 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोल्हापूर जिल्हय़ातील हा आठवा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आहे. कंटेनरमधील उर्वरित 19 जणांचे स्वॅब रिपोर्ट सोमवारी सकाळी मिळाले. यामध्ये हसन (कर्नाटक) येथील पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णासोबत आलेल्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित 36 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
मुंबई येथे कामानिमित्त असलेले कर्नाटकातील 30 कामगार पुटुंबियांसह गुरुवारी, 16 रोजी सांताक्रुझ पुर्व येथून कंटेनरमधून गावी निघाले होते. राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाक्याजवळ पोलिसांनी हा कंटेनर पकडला. त्यातील 30 जणांना सीपीआरमधील आयसोलेटेड वॉर्डमध्ये शुक्रवारी दाखल केले होते. त्यातील काहींना सर्दी, खोकल्याचा त्रास होता. त्यामुळे त्यांचे स्वॅब घेतले गेले. या स्वॅबपैकी हसन येथील एकाचा अहवाल रविवारी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
मिरज येथून रविवारी मध्यरात्रीपासून सोमवारी सकाळपर्यत प्रारंभी 23, पहाटे 9 आणि सकाळी 4 अशा 36 जणांचे स्वॅब रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. तसेच एका 42 वर्षीय महिलेचा स्वॅब रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. हि महिला त्या कंटेनरमधून मुंबईतून कर्नाटकला निघाली होती. हसन येथे निघालेल्या अन् रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णासोबत ती आल्याचे समजते. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ती जिल्हय़ातील नववी कोरोना रूग्ण ठरली आहे.
दरम्यान, इचलकरंजी येथील 60 वर्षीय व्यक्तीचा रिपोर्टही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी काही दिवसांपुर्वी गेली होती. त्यावेळी ती कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाच्या संपर्कात आल्याची किंवा विजापूरचे काही जण इचलकरंजीत नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी आले होते. त्यापैकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला होता, त्याच्या संपर्कात इचलकरंजीतील हा पॉझिटिव्ह रूग्ण आला होता, अशीही चर्चा आहे. इचलकरंजीतील कोले मळा परिसरात हा संशयित रूग्ण रहात होता. त्याचा शुक्रवारी, 17 रोजी स्वॅब घेतला होता. त्याला इचलकरंजीतील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथील आयसोलेटेड वॉर्डमध्ये ठेवले होते. कोले मळा काही दिवसांपुर्वी सील केला होता. त्यादरम्यान संशयिताचा स्वॅब घेतला होता. तो पॉझिटिव्ह आल्याने जिल्हय़ातील हा दहावा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण ठरल्याची माहिती प्रशासनाने दिली.