प्रतिनिधी/कोल्हापूर
जिल्ह्यात काल, रविवारी 15 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. यामध्ये रंकाळा टॉवर परिसरातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण झाली होती. आज याच डॉक्टरच्या हॉस्पीटलमधील रिसेप्शनिस्टलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आज दिवसभरात एकच रुग्ण आढळून आला असला तरी डॉक्टरसह रिसेप्शनिस्टलाही लागण झाल्याने एकच खळबळ उडाली.
या रिसेप्शनिस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 681 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत 425 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून उर्वरित रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर जिल्ह्यात आतापर्यंत 8 जणांचा बळी गेला आहे.