प्रतिनिधी / सांगरूळ
बहिरेश्वर तालुका करवीर येथे कुंभी नदीपात्रात मगरीचे दर्शन झाले आहे . कसबा बीड येथील मासेमारीसाठी गेलेल्या रोहित भोई यांना कुंभी नदीपात्रात संगमाजवळ मगरीचे दर्शन झाले.

मासेमारी भोई समाजाचा पारंपरिक व्यवसाय असून उदरनिर्वाहासाठी भोई समाजाला मासेमारी करूनच आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. पण मगरीच्या वावरीने भितीच्या छायेखाली मासेमारी बांधव आहेत. सध्या पावसाचे प्रमाण कमी होत चालल्याने शेतीला पाणीपुरवठा करणारी इलेक्ट्रिक मोटर पंप नदीकाठावर बसवण्यासाठी शेतकरी वर्गाची धांदल उडाली आहे. मगरीच्या या दर्शनाने नदीकाठच्या परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत व वनविभाग यांचे वतीने करणेत आले आहे. वनविभागाने मगरीला पकडण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.