प्रतिनिधी / वाकरे
भामटे ( ता.करवीर ) येथील गोकुळ दूध संघाचे कर्मचारी गणपती रघुनाथ देसाई यांनी गोकुळ दूध संघातील बंद असलेले दूध पावडर पॅकिंग मशीन स्वतःच्या कुशल तांत्रिक ज्ञानाने सुरू करून कौतुकास्पद कामगिरी केली आहे. याबद्दल त्यांचा गोकुळ दूध संघाचे संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते, अध्यक्ष रवींद्र आपटे यांच्या अध्यक्षतेखाली सत्कार करण्यात आला.
याबाबतची माहिती अशी की गोकुळ दूध संघातील’हस्सीया पावडर पॅकींग मशीनचा’ सर्वो ड्राइव्ह बंद पडलेने मशीन सहा दिवस बंद होते. हस्सीया कंपनीशी याबाबत चर्चा केली असता सर्वो ड्राईव्ह दुरुस्त होत नाही व तो नवीन खरेदी करावा लागेल असे कंपनीने सांगितले.कंपनीकडून त्याची किंमत एक लाख नव्वद हजार इतकी सांगितली होती.गोकुळचे कर्मचारी गणपती देसाई यांनी सदर मशीन खोलून त्याची पाहणी केली असता त्यांना सदर मशीनच्या पॉवर कॉडला प्रॉब्लेम आल्याचे दिसून आले.त्यांनी आवश्यक असणारे कॉम्पोनट खरेदी करून त्या मशीनच्या पॉवर कार्डवर बसवले.त्यानंतर मशीनची ट्रायल घेतली असता मशीन व्यवस्थीत सुरु झाले.
गोकुळ दूध संघांच्या या कुशल कामगाराने संघाचे आर्थिक नुकसान तर टळलेच, त्याचबरोबर कंपनी कामगारासमोरील मशीन दुरुस्तीचे आव्हान त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संचालक मंडळ उपस्थित होते.
Trending
- सर्वांच्या सहकार्यानेच संकटावर मात करणे शक्य; डॉ. कादंबरी बलकवडे
- अल- वतानी पॅराटेबल आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पृथ्वी बर्वेची चंदेरी कामगिरी
- मंडलिक कारखाना निवडणूक बिनविरोधच्या वाटेवर; 21 पैकी 18 जागा बिनविरोध; 9 नवीन चेहऱ्यांना संधी,
- निरक्षरांपेक्षा साक्षर माणसे सर्वाधिक अंधश्रद्ध; ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचे प्रतिपादन
- Satara : शिवस्वराज्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रम संपन्न
- …..अवघी करवीरनगरी झाली ‘शिवमय’
- अकरा महिन्यात 9 हजार 700 ऊग्णांना मदत; मुख्यमंत्री वैद्यकिय सहाय्यता कक्षाचे मंगेश चिवटे यांची माहिती
- मी फक्त बोलतोय; लोक जोड्याने मारतील, पडळकरांची अजित पवारांवर सडकून टीका